पुणे

मंचरला भरवस्तीत तीन दुकानातून चोरी

CD

मंचर, ता. १० : मंचर (ता. आंबेगाव) शहराच्या पूर्वेला मुळेवाडी रस्त्यावर दोन मेडिकल दुकाने व कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून ६१ हजार ८५० रुपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना शनिवारी (ता. ८) पहाटे घडली.

याबाबत शिवबा मेन्सवेअर दुकानाचे मालक ज्ञानेश्वर कांताराम ढेरंगे (रा. एस कॉर्नर-मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिवबा मेन्सवेअर दुकान, अवनीश व स्वराज मेडीकल ही तीन दुकाने भरवस्तीत गजबजलेल्या ठिकाणी आहेत. रात्रीही या भागात नागरिक ये-जा करत असतात. याप्रकरणी पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सुदाम घोडे करत आहेत.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT