पुणे

आंबेगावात भरारी पथकांची नजर

CD

मंचर, ता. ४ : शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनाने गतिमान पद्धतीने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु केली आहे. घोडेगाव, मंचर व पारगाव या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिवसा व रात्री अशी एकूण ६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.
गोविंद शिंदे म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात १४३ गावांत ३३८ मतदान केंद्र आहेत. निवडणुकीसाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक कामकाज सुरू आहे. त्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक तयारी, कर्मचारी नेमणूक, मतदार जनजागृती, आचारसंहिता अंमलबजावणी, एक खिडकी योजनेच्या माध्यमातून जाहीर सभा, मेळावे, प्रचार रॅली यासाठी परवानगी आदी कामकाज सुरू आहे.’’
‘‘आंबेगाव तालुक्यात संवेदनशील मतदान केंद्र नाहीत. अद्याप आचारसंहिताभंगाच्या ऑनलाइन तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. किरकोळ तक्रारीचे निराकरण केले आहे. उमेदवारांना सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी आंबेगाव पंचायत समितीमध्ये एक खिडकी योजना सुरू केली आहे,’’ अशी माहिती आचारसंहिताभंग पथक प्रमुख तथा आंबेगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांनी दिली.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
• एकूण मतदार : २ लाख ९८ हजार ५९८
• स्त्री मतदार संख्या : १ लाख ४५ हजार ७५६
• पुरुष मतदार संख्या : १ लाख ५२ हजार ८३४
• तृतीयपंथी मतदार : ८
• मतदान केंद्रांची संख्या : ३४०
• निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकारी : ३२

विविध विभागांतील सुमारे २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदारांकरिता मेडिकल किट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- डॉ. सचिन वाघ, नायब तहसीलदार, निवडणूक विभाग, आंबेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

SCROLL FOR NEXT