पुणे

मंचरला भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव बुधवारपासून

CD

मंचर, ता. २९ : ‘‘येथील श्री कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. बुधवारी (ता. १) सकाळी हारांचा लिलाव, रात्री पालखी मिरवणूक, शुक्रवारी (ता. ३) कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. विजेत्या पहिलवानांना पाच लाख रुपयांचे इनाम विभागून दिले जाईल. शनिवारी (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मैदानाच्या जवळ बैलगाडा शर्यत होणारा आहे. विजेत्या बैलगाडा मालकांना तीन लाख ४७ हजार रुपये रोख रक्कम इनाम विभागून दिला जाईल.’’ अशी माहिती मंचर यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रेय रामभाऊ थोरात व उपाध्यक्ष प्रवीण सीताराम मोरडे यांनी दिली.
मंचर, शेवाळवाडी व निघोटवाडी येथील ग्रामस्थ एकत्रितपणे यात्रा उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. बुधवारी (ता. १) सकाळी सात वाजता मांडव डहाळे, सकळी ११ वाजता कलगीतुऱ्याचा कार्यक्रम, संध्याकाळी ६ वाजता शोभेच्या दारूची आतषबाजी आणि पालखी मिरवणूक, शुक्रवारी (ता.३) संध्याकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. अशी माहिती मंचर यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सुनील बाणखेले व डॉ. मंगेश बाणखेले यांनी दिली. शनिवारी आणि रविवारी एक ते चार क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडा मालकांना इनाम, फळीफोड आणि घाटाचा राजा म्हणून निवड झालेल्या बैलगाडा मालकांना स्वतंत्र बक्षिस दिले जाईल. अशी माहिती यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष वसंतराव बाणखेले, राजेंद्र थोरात यांनी दिली. मंगळवारी (ता. ७) छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. अशी माहिती संजय बाणखेले, सीताराम लोंढे यांनी दिली. शुक्रवारी (ता. १०) अवघडबुवा आणि म्हसवेश्वर यात्रा उत्सवानिमित्त मांडव डहाळे, हारतुरे कार्यक्रम, शिवजयंती व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती जयसिंग थोरात, कैलास गांजाळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT