पुणे

मतदारांना मतदार चिठ्ठी वाटप करणे गरजेचे

CD

मंचर, ता. २९ : “निवडणूक प्रक्रियेत मतदारांना मतदार चिठ्ठी वाटप करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे पर्यवेक्षक व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदार चिठ्ठी अन्य व्यक्तीकडे न देता मतदार किंवा कुटुंब प्रमुखाकडे देण्याची दक्षता घ्यावी. यासाठी सुक्ष्म नियोजन करून समन्वयाने मतदार चिठ्ठीचे वाटप करावे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज जबाबदारीने करावे. कोणताही मतदार चिठ्ठीपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्यावी.” असे आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगाव-जुन्नर उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात कवयित्री शांता शेळके सभागृहात शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण प्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ व सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे उपस्थित होते. प्रशिक्षणात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT