पुणे

अवसरी खुर्द येथे ज्येष्ठ महिलेची लुट

CD

मंचर, ता. २ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. १) यात्रे निमित्त श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अरुणा साहेबराव शितोळे (वय ७०, रा. कासरसाई ता. मावळ जि.पुणे) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अरुणा शितोळे ह्या श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. येथे भाविकांची मोठी गर्दी असल्याने देवदर्शनाकरिता त्या रांगेत उभ्या होत्या. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. थोड्या वेळानंतर आपल्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मंगळसूत्राचा आजूबाजूला शोध घेतला. पण ते मिळून आले नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तानाजी हगवणे पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT