पुणे

वीज खंडित झाल्याने छुप्या प्रचाराला फटका

CD

मंचर, ता ११ : मंचर शहर, अवसरी खुर्द गावडेवाडी पिंपळगाव तांबडे मळा परिसरात शनिवारी (ता ११) संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विजेचा कडकडाट होत होता. वादळी पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. वीज गायब होण्याच्या प्रकाराने छुप्या पद्धतीच्या निवडणूक प्रचारावरही मोठा परिणाम झाल्याचे जाणवले.
वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरण कंपनीचे जनमित्र व अधिकारी प्रयत्न करत होते. पण वीज पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुन्हा आलेल्या वादळी पावसाने वीजपुरवठा खंडित होत होता. रात्री दहा वाजताही अनेक भागात वीजपुरवठा खंडित झालेला होता.
लोकसभा निवडणुकीचा शनिवारी संध्याकाळी जाहीर प्रचार संपला असला तरी घरात बैठक घेऊन सुरू झालेल्या प्रचारावरही पावसाचा मोठा परिणाम झाला. अनेकांचे मोबाईल चार्जिंग न झाल्याने प्रमुख कार्यकर्त्यांची संपर्क मोहीम यंत्रणा थंडावली होती. काही ठिकाणी आमरस पुरी व बिर्याणी जेवणाचे बेत होते ते रद्द झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT