पुणे

समान भत्ता वाटप न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

CD

मंचर, ता. १६ : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना समान भत्ता न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने लक्ष देऊन सर्वांना समान भत्त्याचे वाटप करावे,’’ अशी मागणी दिव्यांग कर्मचारी संघटना अध्यक्ष शैलेंद्र चिखली यांनी केली आहे.
ते म्हणाले, ‘‘विधानसभा मतदारसंघांनुसार शिरूर, हडपसर व खेड येथे केंद्राध्यक्ष यांना एक हजार ७०० रुपये, मतदान अधिकारी यांना एक हजार ३०० रुपये, विधानसभा मतदारसंघ भोसरी येथे केंद्राध्यक्ष यांना एक हजार ६२५ रुपये, मतदान अधिकारी यांना एक हजार २२५ रुपये व विधानसभा मतदारसंघ आंबेगाव जुन्नर येथे केंद्र अध्यक्ष यांना एक हजार ४०० रुपये, मतदान अधिकारी यांना एक हजार रुपये इतकं मानधन स्वरूपात भत्ता दिले आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ३३८ मतदार केंद्र आहेत. केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची संख्या एक हजार ३५२ कर्मचारी आहेत. त्यांना प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे चार लाख पाच हजार ६०० रुपये मतदान भत्ता वाटप केले आहे. ही रक्कम फारच कमी आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ एकच असल्यामुळे मतदारसंघात नेमणूक केलेले केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सर्व विधान सभा मतदार संघात समान भत्ता देणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. याबाबत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे समान काम, समान भत्ता देण्याबाबत विनंती करणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT