मंचर, ता. २१ : आंबेगाव तालुक्यातील ११ कनिष्ठ महाविद्यालयांचा इयत्ता बारावीचा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ४११ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल ९५.४७ टक्के लागला.
महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज विज्ञान, वाणिज्य शाखा (मंचर), दत्तात्रेय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखा (पारगाव साखर कारखाना), डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज वाणिज्य(लांडेवाडी), श्रीमान निवृत्तिशेठ दाजी पवळे विज्ञान (पेठ), विद्या विकास मंदिर विज्ञान (अवसरी बुद्रूक), जनता विद्या मंदिर विज्ञान (घोडेगाव), श्री. टी. एस. बोऱ्हाडे ज्युनिअर कॉलेज विज्ञान (शिनोली), श्री पंढरीनाथ विद्यालय वाणिज्य (पोखरी), शासकीय आश्रमशाळा विज्ञान, कला (गोहे बुद्रक), श्री भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज विज्ञान (शिंगवे), संगमेश्वर बाबूराव गेनू ढोबळे विद्यालय विज्ञान, वाणिज्य, कला (पारगाव शिंगवे) या विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला.
ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी मंचर येथे संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींची गर्दी झाली होती. १०० टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. विद्यार्थी एकमेकांना मोबाईलद्वारे संपर्क करून किती गुण मिळाले याविषयी माहिती घेत होते.
अन्य विद्यालये नाव व टक्के : अण्णासाहेब आवटे कनिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान- ९२.७२, जनता विद्या मंदिर कला (घोडेगाव)- ९०.५८, वाणिज्य- ९३.६६, श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज विज्ञान (धामणी)- ८८.५७, श्री भैरवनाथ विद्याधाम वाणिज्य, कला (आंबेगाव)- ७६.६६, हुतात्मा बाबू गेनू विद्यालय विज्ञान (महाळुंगे पडवळ)- ९८, नरसिंह ज्युनिअर कॉलेज वाणिज्य (रांजणी)- ८८.४६, श्री. टी. एस. बोऱ्हाडे ज्युनिअर कॉलेज कला (शिनोली)- ९०.१० टक्के, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कला (निरगुडसर)- ७९.१६, श्री मुक्तादेवी विद्यालय कला (नारोडी)- ६६.६६, श्रीमान निवृत्तिशेठ दाजी पवळे (पेठ) वाणिज्य- ९६.४२, कला- ८२.०५, श्री पंढरीनाथ विद्यालय कला (पोखरी)- ८५.७१, कमलजादेवी विद्यालय कला (कळंब)- ७३.३३, शिवशंकर विद्यालय ज्युनिअर कॉलेज कला (तळेघर)- ९२.८५, दत्तात्रेय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय वाणिज्य (पारगाव साखर कारखाना)- ९५.६५, डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज विज्ञान (लांडेवाडी)- ९९.०४, जनता विद्या मंदिर तंत्र (घोडेगाव)- ९३.३३, श्री भैरवनाथ माध्यमिक किमान कौशल्य (अवसरी खुर्द)- ८९.२८.
आंबेगावचा १२वीचा निकाल
एकूण निकाल- ९५.४७ टक्के
एकूण नोंदणी केलेले विद्यार्थी- दोन हजार ४२३
एकूण प्रत्यक्ष बसलेले विद्यार्थी- दोन हजार ४११
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी- दोन हजार ३०२
विशेष योग्यता- १२५
प्रथम श्रेणी- ६१४
द्वितीय श्रेणी- १३११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.