पुणे

तांबडेमळा गाव दोन नळयोजनांसाठी दोन कोटी ६४ लाख ९९ हजार रुपये खर्च पण पिण्याच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित.

CD

मंचर, ता. २ : तांबडेमळा (ता.आंबेगाव) येथे दोन वेळा नळ पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली. त्यासाठी तब्बल एकूण दोन कोटी ६४ लाख ९९ हजार ९९७ रुपये खर्च राज्य व केंद्र सरकारने केला आहे. पण, येथील नागरिक आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. सर्व पैसा वाया गेल्यामुळे या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तांबडेमळा येथील नागरिकांनी केली.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला डोंगराच्या पायथ्याला एक हजार २०० लोक वस्तीचे तांबडेमळा गाव आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी १३ वर्षापूर्वी लेखाशीर्ष महाजल योजनेअंतर्गत ७६ लाख ११ हजार ७०० रुपये खर्च करून नळ योजनेचे काम करण्यात आले. पण, अजूनही ते पाईप अनेक ठिकाणी असेच पडून आहेत. विहिरीचे बक्षीस पत्र करून घेतले नव्हते, त्यामुळे हे कामही वादग्रस्त ठरले. त्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून तांबडेमळा गाव वंचित राहिले होते. तीन वर्षांपूर्वी राज्य व केंद्र सरकारची जलजीवन योजना जाहीर झाली. त्यानुसार या योजनेअंतर्गत एक कोटी ८८ लाख ८८ हजार २९७ रुपये निधी मंजूर झाला. गावकऱ्यांना आनंद झाला. आत्ता किमान दुसऱ्या नळ योजनेतून तरी पाणी मिळेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांची होती.

भोर मळ्यात उजव्या कालव्याच्या पश्चिमेला विहिरीचे खोदकाम करण्यात आले. नळ योजना सुरू झाली. दररोज एक लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण, सध्या उजव्या कालव्याला पाणी उपलब्ध नसल्याने दररोज ४० ते ५० हजार लिटर पाणी विहिरीत जमा होते. त्यामुळे तीन दिवसांनी पाणी कुटुंबाना दिले जाते. येथे पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांच्याकडे केली आहे.”
-प्राजक्ता तांबडे, सरपंच, तांबडेमळा

नळ योजनेच्या कामात अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. दोन्ही नळ पाणी योजनांच्या कामाची चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी.
- मयूर भोर, उपसरपंच, तांबडेमळा


सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. उजव्या कालव्याला पाणी नसल्याने विहरीत पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. जल जिवन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी, विहीर, पंप हाउस, जलवहिन्या ही सर्व कामे शासनाच्या निकषाप्रमाणे व अंदाज पत्रकाप्रमाणे पूर्ण करण्यात आली आहे. नियमानुसार कामाचे परीक्षण झाले आहे.
- महेश पाटील, शासकीय ठेकेदार, तन्मय एंटरप्राइजेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकलचा जम्बो ब्लॉक! 'या' लोकल रद्द, मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम; कधी आणि कुठे? वेळापत्रक पहाच

मालदीवमध्ये स्पीडबोट समुद्रात उलटली; उद्योगपती गौतम सिंघानिया जखमी; ५ जण बेपत्ता

Panchang 21 March 2026: शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sports News: पुणे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे माहेरघर: मागील १२ वर्षांत आठ वेळा यजमानपद

सातारा झेडपीवर प्रथमच भाजपाचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंची खेळी

SCROLL FOR NEXT