पुणे

शिंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा फडशा

CD

मंचर, ता. ११ : एकलहरे-शिंदेवाडी (ता.आंबेगाव) येथे मंगळवारी (ता.११) पहाटे बिबट्याने पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. बिबट्या कुत्र्याला उचलून घेऊन जातानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले फुटेज सध्या प्रसार माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिबट मादी व तिच्या दोन बछड्यांचा दिवसरात्री वावर वाढल्याचे अनेकांनी पाहिले आहे. या भागातील अनेक पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पडला आहे. शेतकरी राजेंद्र शिंदे व संजय शिंदे यांच्या घरासमोर पाळीव कुत्रा होता. दबक्या पावालाने बिबट्या चार पाहिऱ्या चढून ओट्यावर आला. झोपेत असलेल्या कुत्र्यावर क्षणात झडप मारून वाऱ्याच्या गतीने बिबट्या पळल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

एकलहरे-शिंदेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. या भागात बिबट्यांचा वावर आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शाळा सुरू होणार आहेत. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेती कामावरही मोठा परिणाम झाला आहे. वनखात्याने दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी ताबडतोब बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत. तसेच दिवसा व रात्री गस्त सुरू करावी.
- रीना संतोष डोके, सदस्य ग्रामपंचायत एकलहरे (ता.आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT