पुणे

‘दूध उत्पादन वाढीसाठी गायींना सकस आहाराची गरज’

CD

मंचर, ता.२ : ‘‘राज्यात दूध व्यवसायाला अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. गायीचे प्रतिलिटर दूध उत्पादन वाढीसाठी व उत्तम आरोग्यासाठी गायींना सकस आहार देणे गरजेचे आहे. आयुर्वेदिक दूध कांडी पावडरचा पशुखाद्यात वापर केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच शर्यतीच्या बैलांसाठी बुल पॉवर उपयुक्त आहे,’’ असे पराग उद्योग समूहाचे उद्योजक देवेंद्र शहा यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे आयुर्धन वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यावतीने जनावरांना उपयुक्त ठरलेल्या दूधकांडीच्या प्रचंड यशानंतर कंपनीने शर्यतीच्या बैलांसाठी तयार केलेल्या ‘बुल पॉवर’ उत्पादन वाटपाचा प्रारंभप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. यावेळी आकाश दूध प्रकल्पाचे अध्यक्ष संजय थोरात, ग्राहक पंचायतीचे राज्य संघटक बाळासाहेब औटी, बैलगाडा मालक जयसिंगराव एरंडे, रामकृष्ण टाकळकर, मोहन मांजरे, बाळासाहेब आरुडे, साहेबराव आढळराव, अनिल सणस, पांडुरंग तळेकर उपस्थित होते. १०० बैलगाडा मालकांना प्रत्येकी एक किलोप्रमाणे मोफत बुल पॉवरचे वाटप करण्यात आले.
एरंडे म्हणाले की, बुल पॉवरच्या वापरामुळे शर्यतीच्या बैलांची चपळता वाढते. आजारापासून बचाव होण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते.
यावेळी आयुर्धण वेलनेस कंपनीचे कार्यकारी संचालक गुलाब कुंभार म्हणाले, “आयुर्वेदाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. दूधकांडी वापरल्यास गाईचा भाकड काळ कमी होतो. दूध, फॅट व कॅल्शियमची नैसर्गिकरित्या वाढ होते. पशुवैद्यकीय विभागाने मान्यता दिलेले उत्पादन असून आयएसओ मानांकन आहे.”
यावेळी स्वप्नील मोरे, शेतकरी सुभाष गाढवे याची भाषणे झाली. प्रशांत बाजारे यांनी आभार मानले.

11014

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

SCROLL FOR NEXT