पुणे

वाळुंजवाडी ग्रामस्थांचे उपोषण आंदोलन मागे

CD

मंचर, ता. ८ : वाळुंजवाडी (ता. आंबेगाव) येथील नितीन वाळुंज व नीलेश लोंढे यांनी वाळुंजवाडी ग्रामपंचायत येथील गैरकारभाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केले होते. ग्रामपंचायत कामकाजाची चौकशी समितीची नियुक्ती झाल्यामुळे उपोषण स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले.
लोंढे म्हणाले, ‘‘पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन केली आहे. तक्रारदारांच्या समक्ष चौकशी पूर्ण होऊन दहा दिवसांत चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला जाईल. त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतले आहे.’’
दरम्यान सरपंच वैभव वाळूंज म्हणाले, ‘‘गेल्या महिन्यामध्ये आंबेगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केलेली आहे. त्यामध्ये काहीच तथ्य आढळून आले नव्हते. पुन्हा होणाऱ्या चौकशीला आम्ही सामोरे जाणार आहोत. सन २०१२- १३ मध्ये झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची चौकशीची मागणी सरपंच व गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे दिशा भरकटवण्यासाठी गावाची सुरू केलेली बदनामी ही दुर्दैवी आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

SCROLL FOR NEXT