पुणे

मंचर येथे भंडाऱ्याची उधळण करत बैलांची मिरवणूक

CD

मंचर, ता. ४ : आंबेगाव तालुक्यातील मंचर, निघोटवाडी, शेवाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने मंचर येथील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात परंपरेनुसार बुधवारी (ता. २) बैलपोळा उत्साहात साजरा केला. सजावट केलेल्या बैलांची सवाद्य मिरवणूक काढून भंडाऱ्याची उधळण केली.
कुलदैवत श्री भैरवनाथ मंदिरात तळी भंडार करून बैलपोळा महोत्सवाला सुरवात केली. शिस्तबद्ध मिरवणूक, आकर्षक बैलजोडीचे परीक्षण केल्यानंतर विजेत्या बैल मालकांना बक्षीस वितरण गोवर्धन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा, राजाराम बाणखेले, युवराज बाणखेले, दत्ता थोरात, वरद थोरात, निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, शेवाळवाडीचे सरपंच नीलेश थोरात, सुरेश निघोट, बाबाजी थोरात, प्रवीण मोरडे, लक्ष्मण थोरात यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले. सुहास बाणखेले, वसंतराव बाणखेले, जगदीश घिसे, सागर पाचपुते यांनी व्यवस्था पाहिली. यावेळी पशुवैद्यकीय डॉ. बाळशिराम निघोट, सीताराम लोंढे, धोंडिभाऊ शेटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बाळासाहेब टेमगिरे, नवनाथ वाळुंज, स्वप्नील टेमगिरे, अरुण भोर यांनी सूत्रसंचालन केले.
विजेत्यांची नावे : प्रथम- दत्तात्रेय शंकर मोरडे व महादू त्र्यंबक लोंढे. द्वितीय- संजय विठ्ठल निघोट, राजवीर नितीन थोरात, विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंचर. तृतीय- ज्ञानेश्वर सोपान निघोट, विठ्ठल मारुती पाचपुते. चतुर्थ- भिकाजी मोरडे, भानुदास बाणखेले. उत्तेजनार्थ- गणेश अनंता खानदेशे, सीताराम मथाजी लोंढे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

बाबो! १४ वर्षांचं भांडण मिटलं, भाचा कृष्णा अभिषेक आणि सुनिता आहुजाचे रियुनियन, Viral Video

SCROLL FOR NEXT