पुणे

दरोडा, बलात्कारप्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

CD

मंचर, ता. ५ : मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षांपूर्वी दरोडा टाकून बलात्कार केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी अटक केलेल्या संजय पंडित भोसले (रा. कोळगाव शिवार, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या आरोपीला खेड(राजगुरुनगर) सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी सात वर्षे कारावासाची शिक्षा शुक्रवारी (ता. ४) सुनावली.
याबाबत मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी माहिती दिली की, मंचर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एका गावात ६ डिसेंबर २०१८ रोजी पहाटे अडीच ते साडेचार या वेळेत तीन चोरट्यांनी पीडित राहत असलेल्या घरात प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवून त्यापैकी एका आरोपीने महिलेच्या गुप्तभागावर दुखापत करीत बलात्कार करून पीडितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्ती करून चोरून नेले. या गुन्ह्याचा तपास त्यावेळचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी केला. एका आरोपीला अटक करून त्याची ओळखपरेड घेतली. फिर्यादीने आरोपी संजय भोसले याला ओळखले. त्यानंतर आरोपीविरुद्ध सत्र न्यायालय राजगुरुनगर येथे दोषारोप पत्र दाखल केले. सरकारी वकील विकास देशपांडे यांनी कामकाज पाहिले. नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी साक्ष व भौतिक पुराव्याच्या आधारे आरोपीस सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी या गुन्ह्यात आरोपी दोषी असल्याचे सांगून भारतीय दंड विधान कलम ३८० नुसार पाच वर्षे व ४५७ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कंकाळ, न्यायालयीन अंमलदार सुनील बटवाल यांनी न्यायलयीन काम पाहिले. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात आरोपपत्र धस व दप्तरी सोमनाथ वापगावकर यांनी सादर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

SCROLL FOR NEXT