मंचर, ता. १९ : ‘‘अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारातून मंगळवारी (ता. १९) आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील ३४६ मतदान केंद्रावर एकूण तीन हजार ४९२ अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. त्यांच्यासोबत ईव्हीएममशीन, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट होते. वाहतुकीसाठी ५३ एसटी गाड्या, ८१ जीपची व्यवस्था केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत,” अशी माहिती आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ, टपाली मतदान कक्षाचे नोडल अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक मतदानाची जय्यत तयारी केली आहे.
दोन हजार ६५८ कर्मचारी व अधिकारी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत आहेत. त्यामध्ये राखीव कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ९६१ आहे. तीन लाख १४ हजार २५२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष एक लाख ५९ हजार ४६९, महिला एक लाख ५४ हजार ७७३ इतर १० आहेत. सर्व मतदान केंद्रासाठी ३२ क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकारी व कर्मचारी २५० आहेत. एक हजार ९६१ अधिकारी व कर्मचारी राखीव आहेत.
शनिवारी (ता.२३) रोजी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अवसरी खुर्द येथे मतमोजणी होणार आहे. १० टेबल मतमोजणीसाठी आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.
मतदार संघात ३४६ मतदान केंद्रासाठी एक पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी, तीन पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, २७ पोलिस उपनिरीक्षक, ३४९ अंमलदार (२५३ पुरुष व ९६ महिला), ६४४ एकूण पोलिस कर्मचारी व २६१ होमगार्ड, ५६ सीएसआरएफ जवानांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच, त्यासाठी ३६ वाहने तैनात केली आहेत. संपूर्ण मतदार संघात शांततेने मतदान व्हावे. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, ३६ बिनतारी संदेश यंत्रणा असलेल्या पोलिस वाहनामार्फत गस्त घालण्यात येत आहे.
- अमोल मांडवे, उपविभागीय पोलिस अधिकार, खेड विभाग.
-सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदानासाठी व्हीलचेअर व रॅम ची सुविधा उपलब्ध.
-ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला, स्तनदा माता यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष .
-मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा.
-४१३ विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती.
-मतदान केंद्रावर मुक्कामी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ग्रामसेवक, -तलाठी, कोतवाल यांना देण्यात आल्या आहेत.
-संजय नागटिळक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आंबेगाव तालुका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.