मंचर, ता.३: “पत्रकार सतत समाजाचे प्रश्न मांडतात. त्यांची धावपळ सुरू असते. पण स्वतः व कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आजाराचे प्राथमिक आवस्थेत निदान झाल्यानंतर संबंधित आजाराचे निर्मुलन करणे शक्य होते. पत्रकार व कुटुंबीयांनी किमान सहा महिन्यातून एकदा वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे,” असे मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुशील कांबळे यांनी सांगितले.
मराठी पत्रकार परिषद मुंबई ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी तीन डिसेंबर हा दिवस पत्रकार आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मंचर (ता.आंबेगाव) येथे मंगळवारी (ता.३) पत्रकार आरोग्य दिनानिमित्त आंबेगाव तालुका पत्रकार संघ व पराग नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित क पत्रकार कुटुंबासाठी आरोग्य तपासणी शिबिरात आयोजत केले होते. यावेळी ७० हून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली
यावेळी आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत चपटे, पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, डॉ. राहुल जोशी, डॉ.प्रतिभा कहडणे, डॉ.संजीवानी गाडेकर, डॉ.अलकनंदा रेड्डी, डॉ.अनिल देशमुख व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, डी. के.वळसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील यांनी सूत्रसंचालन तर सचिन तोडकर यांनी आभार मानले.
12126
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.