पुणे

उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर नगरपंचायत अलर्ट

CD

मंचर, ता. १८ : अनधिकृत फलकांमुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येत असून वाहतुकीलाही ते अडथळे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने नगरपंचायत हद्दीत लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फलकांवर तत्काळ कारवाई करून संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे मंचर नगरपंचायत अलर्ट झाली आहे. विनापरवाना फलक लावल्यास दंडात्मक कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी २०१८मध्ये मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी फलकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी चालू केली होती. पण, सध्या या नियमाकडे दुर्लक्ष झाल्याने फलकांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत दत्ता गांजाळे म्हणाले, ‘‘वाढदिवस, अभिनंदन व लग्न आदि फलक सर्रास लावले जात आहेत. वादळवाऱ्यामुळे फलक रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता असते. नगरपंचायतीने विनापरवाना फलकांबाबत घेतेलेला निर्णय स्वागतार्ह आहे.’’
‘‘मंचर नगरपंचायत हद्दीत सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी नगरपंचायतीच्या परवानगीने तात्पुरते फलक, बॅनर, जाहिराती, होर्डिंग लावावेत. त्यावर नगरपंचायतीने दिलेला परवानगी क्रमांक, कालावधी स्पष्ट मोठ्या अक्षरामध्ये दर्शविणे तसेच, अर्जदाराचे नाव, परवानगी देण्यात आलेले ठिकाण, क्रमांक, कालावधी इत्यादी माहिती असणारा क्यूआर कोड छपाई करणे बंधनकारक आहे. अनधिकृत फलक लावल्यास दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. येणारा खर्च संबधितांकडून वसूल करण्यात येईल,’’ असे मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सांगितले.

नागरिकांच्या वॉर्डनिहाय समित्या
मंचर नगरपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात लावावयाचे फ्लेक्स व जाहिरात फलकासाठी १८ जागा निश्‍चित केल्या आहेत. अनधिकृत फलक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वॉर्डनिहाय नागरिकांच्या समित्या स्थापन केल्या जातील.

येथून घ्या फलकांची परवानगी
टोल फ्री क्रमांक : १८००-३०९२२२४
व्हॉट्सॲप क्रमांक : ८३०८५०१०७४
ई-मेल : mancharnagarpanchayat@gmail.com
नोडल अधिकारी : वरद थोरात
मोबाईल अॅप्लिकेशन : माझं मंचर, Maaze Manchar
परवानगीसाठी संकेतस्थळ :http://hoarding.manchamp.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT