पुणे

मंचर येथे मिरचीला उच्चांकी बाजारभाव

CD

मंचर, ता.३० : “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (ता.३०) प्रती किलो मिरचीला ७० रुपये, भेंडीला ४० रुपये, फरशीला ५५ रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला. लिंबाचे दर ५० टक्क्याने उतरले आहेत. गेल्या आठवड्यात लिंबाचा दर ७० रुपये होता. सध्या ३० रुपये किलो लिंबाचा बाजारभाव झाला आहे. कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. एकूण तीन हजार ९६१ तरकारी माल पिशव्यांची आवक झाली,” अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश (स्वामी) थोरात यांनी दिली.
आंबेगाव प्रमाणेच शिरूर व जुन्नर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी तरकारी माल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. रविवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज दुपारी तरकारी माल व भाजीपाला खरेदी-विक्री चे व्यवहार अडत्यामार्फत सुरत, मुंबई, पुणे भागातील व्यापारी करतात. खरेदी केलेल्या तरकारीचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देण्याची व्यवस्था येथील आडते करतात.” असे बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे व राम गावडे यांनी सांगितले.

प्रति दहा किलोचे बाजारभाव (रुपयांत) : भेंडी : १५० ते ४००, फरशी : २०० ते ५५०, पापडी : ४०० ते ५५५, पावटा : ६०० ते ६३०, राजमा : ४५० ते ६२१, वालवड : ५०० ते ५२५, लिंबू : १०० ते ३००, काकडी : १०० ते २००.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी सात हजार ४३३ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रती क्विंटलला १६० ते १७० रुपये बाजारभाव मिळाला. यात्रा, लग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांनाआर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. पण अजून बाजारभाव वाढत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. मंगळवार (ता.१ एप्रिल) रोजी कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकरी कांद्याचे बाजारभाव वाढण्याच्या प्रतिक्षेत आहेत.”
- गोविंद ज्ञानेश्वर खिलारी, कांदा उत्पादक शेतकरी, भराडी (आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan MEMU Train : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं झालं सोपं! दिवा ते चिपळूण स्पेशल मेमू धावणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे

ICC ने जाहीर केली वार्षिक कसोटी क्रमवारी! भारताला झाला फायदा, पण ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम

Maharashtra Government : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लंडनमध्ये 'अध्यासन'; राज्य सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार खास स्कॉलरशिप!

Thane: ठाणे एसटीची घसरगुंडी! राज्यस्तरीय कामगिरी परीक्षणात आगारांना नकारात्मक गुण

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

SCROLL FOR NEXT