पुणे

‘पराग मिल्क फूड्स’ने उभारले १६१ कोटी रुपये

CD

मंचर, ता. ४ : भारतातील दुग्धजन्य एफ.एम.सी.जी. क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या पराग मिल्क फूड्स लिमिटेडने शेअर होल्डर्सच्या मान्यतेनुसार १६१ कोटी रुपये किमतीचे परिवर्तनीय वारंट्स जारी केले आहेत. कंपनीच्या कर्जाचे शक्य तितक्या प्रभावीपणे वापर करणे व कंपनीचे खेळते भांडवल व भांडवली खर्चाच्या उपक्रमांना पाठिंबा देणे असा उद्देश आहे, अशी माहिती पराग मिल्क फूड्सचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा व व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शहा यांनी दिली.
शहा म्हणाले, ‘‘प्रख्यात गुंतवणूकदार उत्पल सेट, राजेश काबरा, विशेष दलाल, मेसर्स त्रिशक्ती पॉवर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड, पराग मिल्क फूड्सचे मुख्य धोरण अधिकारी अंकित जैन व देवेंद्र शहा यांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या शक्यतांवर गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ होईल. त्यामुळे पराग मिल्क फूड्सच्या धोरणात्मक दिशेने दमदारपणे वाटचाल करेल.’’

मंडळाने १७९.१० रुपये प्रति शेअर वॉरंट (१६९.१० रुपये प्रीमियमसह) या इश्यू किमतीवर १० रुपयाचे दर्शनी मूल्य असलेले ९० लाख परिवर्तनीय वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली आहे. रूपांतरानंतर हे वॉरंट ९० लाख रुपये पूर्णपणे पेड-अप इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होतील. या वारंट्सच्या माध्यमातून कंपनी नवीन फंड्स उभारण्याचा प्रयत्न आहे. या फंड्सला शेअर बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- देवेंद्र शहा, अध्यक्ष, पराग मिल्क फूड्स

दृष्टीक्षेपात
• भांडवली बाजारपेठेत तीन दशकांहून अधिक कालावधी काम केलेले व (स्व.) राकेश झुनझुनवाला यांनी स्थापन केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या मालकीच्या मालमत्ता व्यवस्थापन फर्म, आरएरीइ एंटरप्रायझेसमध्ये वरिष्ठ भागीदार व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उत्पल सेट यांनी काम केले आहे. त्यांची ‘पराग’मध्ये गुंतवणूक.
• जागतिकस्तरावर ‘पराग’चा ठसा वाढवत उच्च-गुणवत्तेचे, मूल्य-चालित दुग्धजन्य पदार्थ वितरित करण्याच्या आश्वासनाची पुष्टी करते.
• गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास गती, क्षमता वाढवण्यासाठी व सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मिती चालविण्यास प्रेरणा देणारे.
• दुग्ध उद्योगात बाजार नेतृत्व मजबूत करण्यासाठी पराग सुस्थितीत.
• शेअर्सच्या इश्यूमुळे पराग कंपनीला दीर्घकालीन विकास आणि कार्यप्रदर्शनासाठी अतिरिक्त फंड मिळवता येईल. हे वॉरंट्स विशिष्ट अटींवर आधारित असतात, ज्यामुळे इन्क्वेस्टर्सला एक वेगळी संधी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Latest Marathi News Live Update: केरळमध्ये आमची बाजू कमकुवत असली तरीही भाजपचेच राज्य येईल - भाजप खासदार मनोज तिवारी

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT