पुणे

शेतीच्या शाश्वत पाण्यासाठी आराखडा करा : वळसे पाटील

CD

मंचर, ता. २६ : आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघातील वेळ नदी, घोड नदी व भीमा खोऱ्याचा भूशास्त्रीय अभ्यास करून पाणलोट क्षेत्र विकासाला गती द्यावी. त्यासाठी आदिवासी भाग, मध्य, पूर्व भाग व पाबळ परिसर, असे चार विभाग करावेत. पावसाचे पडणारे पाणी शिवारात आडले व मुरले पाहिजे. शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने येत्या पाच वर्षाचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा, अशा सूचना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
पुणे येथे शुक्रवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतीला शाश्वत पाणी मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंदर्भात वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुजाता हांडे, हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, डॉ. सुमंत पांडे, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. एम. पडघमकर, गौरव बोरकर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ. पांडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून सद्यःस्थितीत शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी गावनिहाय माहिती संकलित करा. या कामासाठी अटल भूजल, कृषी विभाग नरेगा जलसंधारण व जिल्हा नियोजन समितीमधून निधी दिला जाईल. मे महिन्यात दर्जेदार कामे झाली पाहिजेत. त्यादृष्टीने गतिमान पद्धतीने संबंधित सर्व यंत्रणांनी काम करावे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

जो परिसर नदी, कालवे या पाण्यापासून वंचित आहे, त्या भागात प्राधान्याने पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करा. जुन्या तलावांची दुरुस्ती, बंधाऱ्यातील गाळ काढणे आदी कामे प्राधान्याने करावीत. या कामासाठी जलसंधारण विभागाप्रमाणेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फतही मदत केली जाईल.
- दिलीप वळसे पाटील, माजी सहकारमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT