मंचर, ता २७ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता२७) दहा किलो कांद्याला १८१ रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या आठवड्यात प्रतिदहा किलोला सर्वाधिक १६५ रुपये बाजारभाव मिळाला होता. तुलनेत थोड्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव वाढले आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवार मंगळवार व गुरुवार रोजी शेतकऱ्यांच्या समक्ष लिलाव पद्धतीने कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार होतात नारोडी, लाखनगाव, अवसरी खुर्द, महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, घोडेगाव या भागातील शेतकऱ्यांनी कांदे विक्रीसाठी आणले होते. पुणे, मुंबई, सुरत कल्याण या भागातील कांद्याचे व्यापारी येथे कांदा खरेदीसाठी आले होते.
प्रति दहा किलो कांद्याचे बाजार भाव: सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा १७० रुपये ते १८१ रुपये,सुपर गोळे कांदे १ नंबर : १५० रुपये ते १६५ रुपये, सुपर मध्यम २ नंबर कांदे १३५ रुपये ते १६५ रुपये, गोल्टी कांदा ११५ रुपये ते १२५ रुपये, बदला कांदा ५० रुपये ते १०० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.