पुणे

खरिपाच्या तयारीसाठी कृषी विभागातर्फे गावागावांत जनजागृती

CD

मंचर, ता.१६ : ‘‘आंबेगाव तालुक्यात १०३ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कृषी खात्याने खरीप हंगाम सन २०२५-२६ ची जय्यत तयारी केली आहे. भात, नाचणी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन व भुईमूग आदि १४ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड केली जाणार असून पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये गावोगावी जनजागृतीचे काम सुरू केले आहे,’’ अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात खरिपासाठी एकूण ६२ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. ढवळे म्हणाले, खरीप हंगाम सभेच नियोजन, माती परीक्षण, जैविक बीज प्रक्रिया अंमलबजावणी व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके, युरिया ब्रिकेट वापर, ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण प्रात्यक्षिके, क्रॉपसॅप (खरीप) सर्वेक्षण मोहीम, प्रमुख पिकांच्या शेतीशाळा, प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रचारासाठी गावनिहाय प्रशिक्षण मोहीम, जमीन सुपिकता निर्देशानुसार खत वापर करणे, खरीप/रब्बी पीक स्पर्धा आयोजन, सोयाबीन पिकात बीबीएफ मूलस्थानी जलसंधारण, फळबाग तंत्रज्ञान वापर, शेतावर जैविक खते व जैविक कीटकनाशके निर्मिती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड व भात शेती यांत्रिकीकरण मोहीम आदी उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

पिकाचे नाव व नियोजित क्षेत्र (हेक्टर)
भात : .........सहा हजार १००
नाचणी.........११०
बाजरी.........एक हजार ९४०
मका.........दोन हजार ४००
तूर.........१०
मूग.........५४०
उडीद.........१६५
सोयाबीन.........दोन हजार ७००
भुईमूग-७००


१०३ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात......... ४८ कृषी सहाय्यक
मंडळ कृषी अधिकारी............ ५
उपकृषी अधिकारी............९


आंबेगाव तालुक्यातील पीक तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन व कीड नियंत्रणावर आधारित प्रात्यक्षिके सादर करत आहेत. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, ता.आंबेगाव


13429

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT