पुणे

अनुदानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी करा

CD

मंचर, ता. २९ : “आदिवासी विभागामार्फत महिला बचत गट, शेतकरी गट तसेच वैयक्तिक पातळीवरील उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या अनुदानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी व आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व्हावा, यासाठी लाभार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.” असे आवाहन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.२८) आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. उईके बोलत होते. यावेळी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम, घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई उपस्थित होते.

आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी, निदान व प्रतिबंधात्मक उपचारांसाठी संचालक, के.ई.एम. हॉस्पिटल संशोधन केंद्र, पुणे व प्रकल्प अधिकारी, घोडेगाव यांच्यातील निःशुल्क सामंजस्य कराराचा प्रारंभ डॉ.उईके यांच्या हस्ते करण्यात आला.

बचत गटाचे नाव व अर्थसहाय्य रक्कम :
* धनलक्ष्मी स्वयंसहाय्यता आदिवासी महिला बचत गट, चास-ठाकरवाडी (ता.आंबेगाव) व सह्याद्री आदिवासी महिला बचत गट ओतूर (ता. जुन्नर) यांना हॉटेल व्यवसायासाठी प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपये रक्कमेपैकी प्रथम टप्पा एक लाख ५० हजार रुपये वितरित.
* मंगेश पोटे, पिंपळगाव घोडे (ता.आंबेगाव) यांना दुचाकी दुरुस्ती व्यवसायासाठी ५० हजार रुपये रक्कमेपैकी पैकी अंतिम टप्पा २० हजार रुपये वितरीत.
* प्रदीप डामसे, कोंढवळ (ता.आंबेगाव) यांना पर्यटनस्थळी आवश्यक साहित्य खरेदीसाठी २० हजार रुपये, रामदास हिले यांना ताडपत्री खरेदीसाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य.
* भीमाशंकर सेंद्रिय शेतकरी गट, निगडाळे (ता. आंबेगाव) भात गिरणीसाठी सात लाख ५० हजार रुपये रक्कमेपैकी अंतिम अर्थसहाय्य ३८ हजार रुपये.

13523

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang: बिश्नोई टोळीला सर्वात मोठा झटका! सरकारकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित, आता पुढची कारवाई काय?

सेल्स गर्ल म्हणून काम करणारी तरुणी आता आहे बॉलिवूडची डान्सिंग क्वीन ! मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

Siddhivinayak Trust Donation : श्री सिद्धिविनायक ट्रस्टने अतिवृष्टीच्या संकटातून महाराष्ट्राला सावरण्यासाठी दिले १० कोटी रुपये!

Virar News : संजय भोईरच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित; स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर तरी गावाला रस्ता मिळणार का?

Latest Marathi News Live Update : गुंड निलेश घायवळवर कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये आणखी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT