पुणे

मंचरला शेतकरी महिलांचा गौरव

CD

मंचर, ता.१: महाराष्ट्राचे पहिले कृषिप्रधान मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंचर येथे देशी वाण लागवड, संवर्धन व रसायनमुक्त शेती या उपक्रमासाठी आठ शेतकरी महिलांचा गौरव करण्यात आला.
शरद बँकेच्या दत्तात्रय वळसे पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील म्हणाले, “देशी वाण आणि नैसर्गिक शेतीचा गावोगावी प्रचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी किमान ५ ते १० गुंठे क्षेत्रात देशी वाण लागवड करावी. यामुळे कुटुंब आजारमुक्त राहण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे देशी बियाण्यांचे संवर्धन आणि रसायनमुक्त शेतीस प्रोत्साहन मिळेल.”
आंबेगाव पंचायत समिती, कृषी विभाग, बाजार समिती, वन व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्ञानशक्ती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे-पाटील, गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, बाजार समितीचे सभापती नीलेश (स्वामी) थोरात, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, रंजना शेटे, रागिणी बोराडे, कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी सलमान शेख, मनीषा गावडे, रोहित थोरात, अपेक्षा वाघुले यांची मनोगते झाली. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

सन्मानित शेतकरी महिला : दीपाली अभंग (अवसरी खुर्द), अश्विनी उभे (दांगटवाडी), जयश्री धुमाळ (पेठ), सुनंदा चासकर (लांडेवाडी), वनश्री वाळुंज (जवळे), मनीषा गावडे (गावडेवाडी), मळगंगा महिला बचत गट, भैरवनाथ महिला बचत गट (पारगावतर्फे खेड)

13538

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT