पुणे

तपनेश्वर स्मशानभूमीत पुन्हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार

CD

मंचर, ता.१९ : मंचर (ता.आंबेगाव) येथील तपनेश्वर स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (ता.१७) अंत्यविधी झालेल्या ठिकाणी रात्री अज्ञात व्यक्तीने गुलाल उधळत पूजा-विधी केल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वीजपुरवठ्याचे कनेक्शन तोडून हा प्रकार करण्यात आला आहे.
या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. येथे यापूर्वीही राखेत लिंबू, नारळ, हळदीकुंकू, बांगड्या आढळून आले होते. मंचर येथील शिवसैनिक दत्तात्रेय नथू थोरात (वय ४५) यांचे बुधवारी (ता.१६) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी तपनेश्वर स्मशानभूमीत गुरुवारी झाला. शुक्रवारी (ता.१८) सकाळी सावडण्याचा कार्यक्रम असल्याने थोरात कुटुंबीय, नातेवाइक व ग्रामस्थ स्मशानभूमीत आले. जिथे दत्तात्रेय थोरात यांचा अंत्यविधी झाला. तिथे चितेवर काहीतरी जळत होते. गुलालाच्या साहाय्याने रिंगण काढून हळदीकुंकू वाहत पूजा, विधी केल्याचे आढळून आले. वारंवार घडत असलेल्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ते म्हणाले, “हा प्रकार मंचरसारख्या प्रगतशील शहरासाठी लज्जास्पद असून अंधश्रद्धा अजूनही समाजात खोलवर रुजलेली आहे.”

13679

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rules: सरकारची मोठी घोषणा, आता UPI द्वारे गोल्ड लोन आणि पर्सनल लोनसाठी पैसे काढता येणार; जाणून घ्या नवे नियम

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील धानोरीत दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

Solapur Crime: 'क्राईम पेट्रोल पाहून आखला महिलेच्या खुनाचा प्लॅन'; मंगळवेढा पोलिसांची ‘त्या’ महिलेच्या घरी भेट

Mumbai : मुलाच्या अंगावर सोडला पिटबुल, कुत्रा चावताना मालक हसत होता; लोकांनीही मदतीऐवजी बनवले व्हिडीओ

Drug Mafia Ichalkaranji : गरिबांचा आधार वस्त्रनगरीला राजकारणी, जिम ट्रेनर, इंजिनिअर नशेबाजांनी पोखरलं, ड्रग्सची अंडरवर्ल्ड साखळी

SCROLL FOR NEXT