मंचर, ता. २० : ‘‘आंबेगाव-शिरूर तालुक्यातील शाळांच्या दुरुस्ती व नव्या वर्गखोल्या उभारणीसाठी चार कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला आहे,’’ अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
शिक्षण विभागासाठी ‘जिल्हा परिषद शाळा सक्षमीकरण व देखभाल-दुरुस्ती कार्यक्रम’ या लेखाशीर्षकाखाली २०२५-२६ च्या जिल्हा परिषद मूळ व पुरवणी अंदाजपत्रकात ही तरतूद करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यात नवीन १७ वर्गखोल्यांसाठी प्रत्येक १४ लाख रुपये असा एकूण दोन कोटी ३८ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
गावाचे नाव व नवीन वर्गखोली आकडेवारी कंसात :
वाळुंजवाडी (१), गंगेवाडी-पारगाव तर्फे खेड (१), वळती (२), अवसरी खुर्द (२), साकोरेमळा-शिंगवे (१), शेवाळवाडी-लांडेवाडी चिंचोडी (१), भागडी (२), मोरडेवाडी (२), कोकणेवाडी-बोरघर (२), आंबेदरा (१), फंडवस्ती-रांजणगाव गणपती (२).
शाळा देखभाल- दुरुस्ती व कंसात खर्च (रुपये) :
आंबेगाव तालुका : साखरशाळा-पारगाव (१५ लाख), गंगापूर खुर्द (नऊ लाख), पांढरी-खडकी (सहा लाख), पिंगळवाडी-नारोडी (सात लाख), नंदकरवाडी-फुलवडे (पाच लाख), भावडी (१२ लाख), पोखरी (नऊ लाख ५० हजार), कारेगाव (आठ लाख ५० हजार ), पोखरकरवाडी (सहा लाख), ठाकरवाडी-शिनोली (सात लाख), जांभळेवाडी-चास (सात लाख), पारगाव तर्फे खेड (नऊ लाख २५ हजार), शिंगाडवाडी-गोहे बुद्रूक (सहा लाख), नानवडे (सहा लाख), तळेकरवाडी-साल (१५ लाख), मंचर क्रमांक एक (आठ लाख), पालखेवाडी-राजपूर (सहा लाख), ठाकरवाडी-चास (सात लाख), बाभुळवाडी-साल (आठ लाख), कुंभेवाडी-आसाणे (सात लाख).
शिरूर तालुका :
वागदरेवस्ती-कवठे येमाई (सात लाख), हिवरे कुंभार (नऊ लाख), पिंपरखेड (सात लाख), सुक्रेवाडी-केंदूर (पाच लाख).
एकूण खर्च : एक कोटी ९३ लाख रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.