मंचर, ता. २१ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात पावसाने ताण दिल्याने तब्बल सहा हजार एकर क्षेत्रातील बटाटा पीक सुकण्याच्या मार्गावर होते. मात्र, सोमवार (ता. १८) ते बुधवार(ता.२०) या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे फुलोऱ्यात आलेल्या बटाटा पिकाला जीवदान मिळाले असून पिकाची जोमदार वाढ सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आहे.
कुरवंडी, कोल्हारवाडी, थूगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव या परिसराला ‘बटाट्याचे आगर’ म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामात शेतकरी मुख्यत्वे बटाटा पिकाची लागवड करतात.यावर्षी पहिला टप्पा ता.२० जून ते ता.२५ जूनदरम्यान तर दुसरा टप्पा ता.१० जुलै ते २० जुलैदरम्यान बटाटा लागवड झाली.
शेतकरी अनेक कंपन्यांशी करार करून बटाटा पीक घेतात. यावर्षी कंपन्यांनी सरासरी प्रतिकिलोला १९ रुपये ५० पैसे असा बाजारभाव निश्चित केला आहे. मात्र या भावात फक्त तोंडमिळवणी होते, अशी खंत कुरवंडी येथील शेतकरी सुनील तोत्रे व रवींद्र तोत्रे यांनी व्यक्त केली.
सातगाव पठार भागातील दोन हजार ६०० हून अधिक शेतकऱ्यांचे बटाटा हे मुख्य पीक आहे.या पिकावरच वर्षभर येथील कुटुंबांची उपजीविका चालते. शेती टिकाऊ आणि फायदेशीर ठरायची असेल तर हमीभाव प्रती किलोला किमान २५ रुपये मिळालाच पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीज होईल.” असे भावडी येथील सोपानराव नवले यांनी सांगितले.
यंदा सुरुवातीला पाऊस चांगला झाला, पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दांडी मारल्याने पिकाची वाढ थांबली होती. फुलोऱ्यात आलेल्या पिकाला पाण्याची नितांत गरज असताना पाऊस उशिरा झाल्याने शेतकरी चिंतेत होते.झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्यांच्या पिकाला नवे बळ मिळाले आहे.
एक एकर क्षेत्रासाठी तब्बल ८०० किलो बटाटा वाण लागतो. यासाठी पुणे जिल्हा बँक, सहकारी सोसायट्या, पतसंस्था, कंपन्या आणि काही हुंडेकरी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना बटाटा पिकासाठी कर्ज पुरवठा केला जातो. खते, औषधे, मजुरी मिळून एकरी ६५ ते ७० हजार रुपये खर्च होतो. ७५ ते ८० दिवसांत बटाटा पीक काढणी करता येते. साधारणपणे पाचपट म्हणजे चार टन उत्पादन मिळते.
- रमेश सावंत पाटील, बटाटा उत्पादक शेतकरी पारगावतर्फे खेड (ता.आंबेगाव)
13924
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.