पुणे

शेवाळवाडी येथील मंदिरासाठी रमेश येवले यांच्याकडून देणगी

CD

मंचर, ता. १ : बांधकाम व्यवसायिक रमेश येवले यांनी गणेशवाडी- शेवाळवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री गणेश मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी एक लाख ५१ हजार रुपये रोख देणगी शिवशक्ती गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष शशिकांत बढे यांच्याकडे सुपूर्त केली.
हनुमंत महाराज गंगथडे (श्री क्षेत्र आळंदी) यांचे कीर्तन सुरु असताना त्यांनी उपस्थित भाविक व ग्रामस्थांना श्री गणेश मंदिराच्या बांधकामासाठी मदतीचे आवाहन केले होते. यावेळी उपस्थित असलेले रमेश येवले यांनी उस्फूर्तपणे देणगीची घोषणा केली होती. त्यांनी प्रत्यक्ष मंदिर परिसरात येऊन ती रक्कम सुपूर्त केली. त्यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्रीगणेशमूर्ती देऊन सत्कार केला.
येवले म्हणाले, ‘‘धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रासाठी वेळोवेळी मदत करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. या मंदिराचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मदत करावी.’’
यावेळी योगेश थोरात यांनी श्री गणेश मंदिरासाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली. त्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच माधुरी शेटे, उपसरपंच मेघा चिखले, अमोल थोरात उपस्थित होते.
MAC25B14232

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT