पुणे

रब्बीतही बटाटा लागवडीकडे कल

CD

मंचर, ता. १० : खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर व पारनेर तालुक्यांत बटाटा वाण लागवडीसाठी हवामान अनुकूल असल्याने रब्बी हंगामातही बटाटा लागवडीचा कल वाढत आहे.
चार एकर क्षेत्रात लागवड करत असून २० क्विंटल बटाटा वाण प्रतिक्विंटल तीन हजार ३०० रुपयाने घेतला आहे. मशागत, मजुरी, फवारणी मिळून एकरी खर्च सुमारे ४० हजार रुपये येतो. उत्पादन आठ ते नऊ पट मिळून चांगला भाव मिळाल्यास एकरी ५० ते ६० हजार नफा मिळू शकतो. सध्या उत्पादित बटाट्याला प्रतिकिलो २० ते २२ रुपये बाजारभाव आहे, असे आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी अशोक तोत्रे व किसन तळेकर (रा. बुट्टेवाडी) यांनी सांगितले.


खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात मंचर बाजार समितीत बटाटा वाण विक्री केली जाते. रब्बी हंगाम ता.१५ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहील. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वजन, दर व पारदर्शक व्यवहारामुळे येथील बाजारपेठेला विश्वास मिळाला आहे. यामुळे ४५० हून अधिक हमाल, मापाडी व अडत्यांना रोजगार मिळाला आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर तालुक्यात बटाटा वाण लागवडीला हवामान अनुकूल आहे. यावर्षी देशात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. बटाटा पिकाप्रमाणेच अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. खाण्यासाठी, वेफर्स, चिवडा, कीस, चिप्स, सामोसा व बटाटेवडे या खाद्यपदार्थात बटाट्याचा वापर वाढला आहे. सध्या उत्पादित बटाट्याला प्रतिकिलो २५ रुपये बाजारभाव आहे. हे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता असल्याने बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
- डॉ. पी. बी. कोळेकर, कृषितज्ज्ञ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT