पुणे

लांडेवाडीत कवायत, लेझीम सादरीकरण

CD

मंचर, ता. २२ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे गुरुवार (ता. २०) ते शनिवारपर्यंत (ता. २२) ॲथलेटिक मीट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कवायत, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब व योगा, तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केली.
तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी हिप-हॉप नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या क्रीडा महोत्सवात धावणे, पोहणे, ट्रॅक ॲण्ड फिल्ड तसेच इतर विविध स्पर्धांमध्ये एकूण एक हजार ८०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. भैरवनाथ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. स्कूलचा कर्णधार विहान सांडभोर व उपकर्णधार दीप गुजराथी याने उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सांडभोर याने सर्व विद्यार्थ्यांना शिस्त व नियम पालनाची शपथ दिली.
विद्यार्थ्यांना क्रीडाशिस्त, खेळांचे महत्त्व व नियमित सरावाचे उपयुक्त पैलू याबाबत मार्गदर्शन प्राचार्या शबनम मोमीन यांनी केले. यावेळी संस्थेच्या प्रशासनाधिकारी प्रा. श्यामल चौधरी, मुख्याध्यापक राजू आढळराव, प्राचार्य डॉ. संजय चौधरी, उपप्राचार्या रजनी बाणखेले व डेक्कन मराठा कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सचे प्राचार्य सुनील गावशेते आदी उपस्थित होते. कृतिका बनसोड व सोनिया पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी

Google Investment : गुगल भारतात १.३५ लाख कोटींची गुंतवणूक करणार ; अमेरिकेपर्यंत समुद्राखाली केबल टाकणार

Property Tax : मिळकतकरात वाढीचा प्रस्ताव फेटाळला; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT