पुणे

अवसरी खुर्द येथील जीर्ण इमारत कालबाह्य

CD

मंचर, ता.२५ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत पूर्णतः जीर्णावस्थेत असून ती कालबाह्य झाली आहे. त्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांची वानवा आहे. यामुळे शेतकरी व पशुधनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दवाखान्याच्या इमारतीवर जुने पत्रे आहेत. त्यालाही गंज लागलेला आहे.


शिवाय दवाखान्यासाठी स्वमालकीची इमारत नसून भैरवनाथ दूध संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर सेवा सुरू आहे; मात्र दुरुस्तीसाठी आवश्यक निधी अद्याप मिळालेला नाही. दवाखान्यासाठी १९८२ मध्ये सुरू झालेल्या या सुरुवातीला इमारत नव्हती. त्यावेळी भैरवनाथ दूध संस्थेने पुढाकार घेऊन इमारत उपलब्ध करून दिल्यामुळे दवाखाना सुरू झाला. परिसरात सहकारी व खासगी आठ दूध संस्था कार्यरत असून, एकूण तीन हजार २५७ पशुधनांमध्ये गाय, म्हैस, शेळ्या व मेंढ्यांचा समावेश आहे.
साथीच्या रोगांच्या काळात प्रथम श्रेणी पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत वाळुंज व परिचर संतोष चव्हाण तातडीने प्रतिसाद देत शेतकऱ्यांना मदत करतात.
अवसरी खुर्द गावात इतर सर्व शासकीय कार्यालयांसाठी आधुनिक इमारती उभारण्यात आल्या असताना, पशुधनाच्या महत्त्वपूर्ण सुविधेसाठी मात्र योग्य इमारत अद्याप उभारली न गेल्याबद्दल ग्रामस्थांत नाराजी दिसून येते.


यांची आहे गरज
- आधुनिक स्वमालकीची सुसज्ज इमारत
- पंखा
- शौचालय
- भौतिक सुविधा


अवसरी खुर्दमधील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामासाठी गावातील गायरान जमिनीतून २० गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे. ही जागा पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे नोंद झाली आहे. बांधकामासाठी निधी मिळवण्याचे नियोजन असून, निधी प्राप्त झाल्यानंतर प्रशस्त व सर्व सोयीयुक्त नवीन इमारत उभारण्यात येईल, असे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे यांनी सांगितले.
-


लसीकरण :
लाळ्या खुरकूत..........३,४००
लंपी..........३,३००
आंत्रविषार ........१०००
घटसर्प..........८००
फाऱ्या..........१००

ता.१ एप्रिल ते ता.१५ नोव्हेंबरपर्यंची स्थिती
उपचार.........८०६
कृत्रिम रेतन.........४३८
गर्भ तपासणी.........४२३
होलस्टन फ्रीजन.........४०२
वंध्यत्व तपासणी.........३०५
वासरांचा जन्म.........२४६
बिबट हल्यात जखमी व उपचार.........१४
रेबीज.........११

वैरण बियाण्यांचे वितरण.........१४०किलो

चारा योजना (टनांत)

हिरवा चारा उत्पादन.........८०,०००
वाळलेला चारा.........४,०००


पशुवैद्यकीय दवाखाण्याच्या कार्य क्षेत्रात अवसरी खुर्द तांबडेमळा, भोरवाडी या गावांचा समावेश आहे. दुभत्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एकूण १९ हजार लिटर पेक्षा जास्त दूध उत्पादन होते. औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात आहे.
- डॉ. वसंतराव वाळूंज, प्रथम श्रेणी, पशुधन विकास अधिकारी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)

14638

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT