पुणे

मंचरमध्ये दंगा काबू पथकाची रंगीत तालीम

CD

मंचर, ता.१ :मंचर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२)रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी मंचर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसानी मंचर शहरात पथसंचलन केले.दंगा काबू पथकाची रंगीत तालीम (मॉब ड्रिल) घेण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचरच्या मैदानात झालेल्या या तालमीत १ पोलिस निरीक्षक, २ साहाय्यक निरीक्षक, १० अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप-१ पुणे येथील १ अधिकारी व ५४ अंमलदार, १ आरसीपी पथक, १५ होमगार्ड तसेच ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका अशा मोठ्या प्रमाणात यंत्रणा सहभागी झाली. नियोजनाप्रमाणे संपूर्ण दंगा काबू सराव यशस्वीरीत्या पार पडला. तालमीनंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक काजीपुरी, अवलिया दर्गा, बाजार तळ, लक्ष्मी रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर अशा मार्गाने पोलिसांनी संचलन केले. या संचलनामध्ये एसआरपीएफचे अधिकारी-व कर्मचारी, मंचर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, आरसीपी पथक आणि होमगार्ड सहभागी झाले होते. आगामी निवडणुकीत शांतता व शिस्त कायम राहावी यासाठी पोलिस दल पूर्ण तयारीत आहे, असे कंकाळ यांनी सांगितले.


4686

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर; महसूल पथकाने हॉटेलवर कारवाई केली

SCROLL FOR NEXT