पुणे

मंचरमध्ये उमेदवारांसह समर्थकांमध्ये धाकधूक

CD

मंचर, ता.२ : मंचर(ता.आंबेगाव) नगरपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवारी (ता.३)होणार होती,पण रविवारी (ता.२१) होणार असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निवडणूक निकालाविषयी धाकधूक वाढली आहे.कोण निवडून येणार ,कोण कुणाची मते खाणार याविषयी जोरदार चर्चा रंगत आहेत.
नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार व १६ नगरसेवक पदांसाठी ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.पण सकाळी फारशी गर्दी जाणवली नाही. मतदारांची टक्केवारी काही प्रभागांत अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने उमेदवार अस्वस्थ आहेत. ‘काही कार्यकर्ते निष्क्रिय राहिले’, ‘समोरच्यांनी मतदार हलवले’, ‘महत्त्वाचे समर्थक विरोधकांच्या संपर्कात गेले’ अशा चर्चा रंगल्याने उमेदवारांचा धीर खचल्याचे पहावयास मिळाले.

मतदारांसाठी ने-आण व सुविधा भक्कम
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यापक तयारी केली. सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर ज्येष्ठ नागरिक, महिला, वाड्या वस्तीतील मतदारांसाठी खास चारचाकी, जीप आणि दुचाकीची सोय, चहा-पाणी, नाश्ता सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

4697

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT