पुणे

वऱ्हाडी मंडळींना वाहतूक कोंडीचे विघ्न

CD

मंचर, ता. १२ : शहरातील पिंपळगाव फाट्यावर शुक्रवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विवाह सोहळे व साखरपुडा समारंभांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वाहतूक कोंडीच्या वेळी एकही पोलिस उपस्थित नसल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी मंचर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल संताप व्यक्त केला.
मंचर शहरात जवळपास बारा मंगल कार्यालये असून सर्व ठिकाणी शुक्रवारी विवाह व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होते. नवरदेवांच्या मिरवणुकांमुळे वाहतूक अधिक विस्कळित झाली. जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पिंपळगाव फाटा चौक हा नाशिक, श्री क्षेत्र भीमाशंकर, पुणे व शिरूर मार्गांसाठीचा मुख्य चौक असल्याने वाहनांची गर्दी वाढली होती. दरम्यान, उसाने भरलेले दोन ट्रॅक्टर, चार ट्रॉल्या व एक रुग्णवाहिका काही काळ कोंडीत अडकून राहिल्याने नारायणगाव व राजगुरुनगर या दोन्ही दिशांना पाऊण किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही जागरूक नागरिकांनी मंचर वाहतूक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, लग्नसोहळ्यांचा हंगाम लक्षात घेता दररोज वाहतूक पोलिसांची नियुक्ती पिंपळगाव चौक, मुळेवाडी चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात करावी, अशी मागणी मंचर व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष सागर काजळे व सुहास बाणखेले यांनी मंचरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळे यांच्याकडे केली आहे.

4786

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT