मंचर, ता. १ : मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीच्या प्रथम नवनिर्वाचित नगराध्यक्षा राजश्री दत्ता गांजाळे यांनी गुरुवारी (ता. १) नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. तत्पूर्वी शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
राजश्री गांजाळे नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होताना नगरसेवक वसंत बाणखेले (ठाकरे शिवसेना),अंजली बाणखेले (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस), विकास जाधव, अंशरा शेख, लखन पारधी (शिवसेना) आदी उपस्थित होते. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन राजश्री गांजाळे यांचे स्वागत केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात व माजी सरपंच दत्ता गांजाळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मंचर नगरपंचायतीला पूर्वीपेक्षा दहापट निधी मिळणार असून, शहराच्या विकासासाठी शिवसेना वचनबद्ध आहे. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून मंचर शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविली जाईल.’’
यावेळी राजश्री गांजाळे म्हणाल्या, ‘‘मंचरकरांनी दिलेल्या विश्वासाला पात्र राहून मी काम करेन. मी जनतेची नगराध्यक्ष असून, नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कार्यरत राहीन.’’
दिव्यांग संघटनेचे समीर टाव्हरे व सुनील दरेकर यांच्यासह दिव्यांग बांधवांनी नगराध्यक्षांना दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांवर सकारात्मक विचार करून प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन राजश्री गांजाळे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.