पुणे

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वीरा चांदवडकर प्रथम

CD

मंचर, ता. १७ : “मंचर (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अण्णासाहेब आवटे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध गटात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला. माध्यमिक गटात वीरा चांदवडकर हिने प्रथम क्रमांक व महाविद्यालयीन सांघिक करंडक- अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या गायत्री खेडकर व आकांक्षा नरवडे यांनी पटकावला,” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी दिली.
स्पर्धेचे उद्‍घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब बेंडे व अण्णासाहेब आवटे यांचे नातू अजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. अन्य विजेते माध्यमिक गट - द्वितीय प्रणव जाधव, तृतीय वेदांत येवले, उत्तेजनार्थ -अक्षता मोडवे .
कनिष्ठ महाविद्यालय गट - प्रथम प्राची पवार, द्वितीय यशराज हेगडे, तृतीय स्वस्तिका बोऱ्हाडे, उत्तेजनार्थ -अनिशा डोके.
कनिष्ठ महाविद्यालयीन सांघिक गट- प्रथम तुषार शिंदे, द्वितीय -सुरज लांडगे.
वरिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम-स्नेहल ढोबळे, द्वितीय- अमोल गोळे, तृतीय- यश पाटील, प्रोत्साहनपर पारितोषिक- आकाश बोडके.
उपप्राचार्य प्रा. सुनील सालके, डॉ. शाम मिसाळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रिया इंझळकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गणेश वाघ व डॉ. तुषार ढोणे यांनी केले. आभार डॉ. पी. बी. गार्डी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT