मंचर, ता. २१ : मंचर (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. २१) ते बुधवार (ता. २८) या कालावधीत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ व मंचर येथे संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या ‘मंचरी ग्रंथा’ची सवाद्य मिरवणूक फुलांनी सजविलेल्या रथातून काढण्यात आली. अग्रभागी २५० वारकरी व मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
बागल मैदान येथे संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ व संत तुकाराम महाराज ग्रंथ यांचे पूजन नामदेव महाराज वाळके, पांडुरंग महाराज येवले, विकास महाराज हगवणे, बजरंग महाराज गावडे, सिद्धेश महाराज वाबळे, गणेश महाराज घोडेकर व महाजन कुटुंब यांच्या हस्ते झाले. लक्ष्मी रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, बाजार समिती मार्गे बागल मैदान असा मिरवणुकीचा मार्ग होता.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी मी वारकरी आंबेगावचे दादाभाऊ पोखरकर, बाजीराव महाराज बांगर, सुरेखा महाराज शिंदे, नवनाथ महाराज गावडे, कांताराम बाणखेले, बबनराव मोरडे आदी होते. सुभाष थोरात, बाळासाहेब थोरात, राजू बोऱ्हाडे, सुनील तोत्रे, नवनाथ वाबळे यांनी व्यवस्था पाहिली.
दरम्यान, सकाळी संतोष महाराज बढेकर व संध्याकाळी एकनाथ महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले. पराग मिल्क फुड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा व जनसेवक रामेशभाऊ येवले यांनी अन्नप्रसादाची व्यवस्था केली. येथे सहा हजार भाविकांची बैठक व्यवस्था केली आहे. सांगता समारंभ बुधवारी(ता.२८) आहे.
15056
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.