पुणे

‘आंबेगाव खरेदी-विक्री संघाचे कामकाज पारदर्शक’

CD

मंचर, ता. २५ : ‘‘आंबेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, वेळोवेळी खतांचा पुरवठा केला जातो. संघाची आर्थिक वार्षिक उलाढाल सात कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती विषयी प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील अनेक सहकारी खरेदी-विक्री संघ आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहेत. त्या तुलनेत आंबेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे कामकाज अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व कौतुकास्पद आहे,’’ असे प्रतिपादन इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार शिवराम झोले यांनी केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या मुख्य कार्यालयाला इगतपुरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ (घोटी बुद्रुक) यांच्या संचालक मंडळाने अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने सदिच्छा भेट दिली. यावेळी संघाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.
आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना, आजवरची वाटचाल, आर्थिक शिस्त व विविध उपक्रमांची माहिती याबाबतचे सादरीकरण संघाचे व्यवस्थापक गणेश हुले यांनी केले. शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले व उपाध्यक्ष श्यामराव बांबळे यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी संचालक मधुकर बोऱ्हाडे, भगवानराव वाघ, मनोजकुमार रोडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिवराम झोले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

15082

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

Chandigarh Schools Bomb Threat: चंदीगडमधील ९ पेक्षा अधिक शाळांना बॉम्ब स्फोटाची धमकी; कॅम्पस तातडीने केले रिकामे

Small Charter Planes Safety : लहान चार्टर्ड विमानांमध्ये प्रवास करणे खरोखर धोकादायक आहे का?

SCROLL FOR NEXT