पुणे

आवटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नारायणगावातील हवामान केंद्रास भेट

CD

मंचर, ता. १ : येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील भूगोल विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी नारायणगाव (ता.जुन्नर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील स्वयंचलित हवामान केंद्राला अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट दिली. वर्गातील सिद्धांत प्रत्यक्ष उपकरणांच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाली.
एकदिवसीय क्षेत्रभेटीत भूगोल विभागप्रमुख प्रा. विकास मिंढे, प्रा.अविनाश बर्डे, डॉ. माधुरी काठे यांच्यासह १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. हवामान केंद्राची रचना, कार्यपद्धती आणि संकलित हवामान माहितीचे विश्लेषण समजून घेणे हा भेटीचा मुख्य उद्देश होता, असे प्रा. मिंढे यांनी सांगितले.
हवामान केंद्र अधिकारी डॉ. सुयोग खोसे यांनी विद्यार्थ्यांना विविध अत्याधुनिक उपकरणांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी वाऱ्याची गती मोजणारे अनीमोमीटर, वातावरणातील तापमान मोजणारे तापमापक, हवेतील आद्रता मोजणारे हायग्रोमीटर तसेच पावसाचे मोजमाप करणारे पर्जन्यमापक कसे कार्य करतात? याचे प्रात्यक्षिकांसह स्पष्टीकरण दिले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
याबरोबरच विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील एकात्मिक शेती पोषण प्रकल्प विभाग व नैसर्गिक शेती प्रकल्प विभाग यांचीही माहिती घेतली. केंद्रातील नर्सरी प्रमुख अक्षय लांडे यांनी जांभूळ, आंबा, अंजीर, झेंडू, गुलाब तसेच टेरेस फार्मिंग (छतावरील शेती) याविषयी मार्गदर्शन केले.


नारायणगाव येथील हवामान केंद्राच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना हवामानशास्त्र, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. अभ्यासक्रमाशी जोडलेली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
- प्रा. डॉ. माधुरी काठे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर


15135

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

'शुभविवाह' मालिकेतील अभिनेत्रीचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क; आजार की आणखी काही?

Pune Municipal Corporation: कनिष्ठ अभियंत्यांच्या भरती रखडल्याने महापालिका ‘टुलीप’ इंटर्नशिपवर अवलंबून

SCROLL FOR NEXT