मंचर, ता. १० : आंबेगाव तालुक्यात पाच केंद्रावर व नारायणगाव येथील केंद्रावर इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारी (ता. १०) शांत व शिस्तबद्ध वातावरणात सुरू झाली. शिनोली, पारगाव, घोडेगाव, मंचर येथील दोन केंद्रे आणि नारायणगाव अशा एकूण सहा परीक्षा केंद्रांवर तीन हजार ३७० विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर दिला. परीक्षेचा प्रारंभ सुरळीत झाल्याची माहिती आंबेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका यांनी दिली.
प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहा शिक्षकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्रसंचालक नेमण्यात आला असून, कस्टडी अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका स्वतः कामकाज पाहत आहेत.
भीमाशंकर विद्यालय शिनोली, जनता विद्या मंदिर घोडेगाव, संगमेश्वर विद्यालय पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, महात्मा गांधी विद्यालय मंचर आणि रा. प. सबनीस विद्यालय नारायणगाव या सर्व केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.