पुणे

गुरू-शिष्य नात्याचा हृदयस्पर्शी सोहळा

CD

मंचर, ता. ११ : श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील सन १९९५-९६ इयत्ता दहावीबॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयीचा आदर, कृतज्ञता आणि आपुलकी जपणारा आगळावेगळा शिक्षक सन्मान दौरा शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ८)यशस्वीपणे पार पाडला. या दोन दिवसीय उपक्रमाने शिक्षणातील ऋणानुबंधांचे अनोखे दर्शन घडवले.
या दौऱ्यात एकूण २० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही औपचारिक सोहळा न करता, ज्या-ज्या शिक्षकांनी अध्यापन केले. त्या शिक्षकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांचा सन्मान करणे, आशीर्वाद घेणे, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि भावपूर्ण वातावरणात निरोप घेणे, असा हा प्रवास होता.
दौऱ्याची सुरुवात पिंपळगाव येथून झाली. त्यानंतर खडकी, मंचर, अवसरी, आळंदी, मंगळवेढा, पंढरपूर आणि शेवटी बारामती येथे सांगता झाली. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन संदीप पोखरकर यांनी केले, तर बाबाजी पोखरकर, महेश पोखरकर, लहू बांगर, अनिल शिंदे, गजानन पोखरकर, देवराम बांगर व इतर सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहकार्य केले. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेला आदर, प्रेम आणि आपुलकी पाहून सर्व शिक्षक भारावून गेले; त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. समारोपप्रसंगी शिक्षकांनी पिंपळगाव शाळा, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या दौऱ्यात प्रल्हाद घाटकर (मंचर), हरिभाऊ वाघ (खडकी), श्री. सुरेश खोल्लम (आळंदी), एस. एस. जाधव (श्री क्षेत्र आळंदी),
सुधाकर शिंदे व सुषमा शिंदे (मंगळवेढा), अशोक माघाडे (पंढरपूर), तुकाराम कांबळे (महूद), सूर्यकांत भालेराव, अशोक गाढवे, विजया काकडे/कदम (बारामती) आदी गुरुजनांची भेट घेतली
बारामती येथे काकडे यांनी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केला. त्याक्षणी सर्व विद्यार्थी भावुक झाले. दौऱ्याचे चित्रीकरण व डॉक्युमेंटेशन वैभव पोखरकर (मंचर) यांनी केले. हा ऐतिहासिक क्षण कायमस्वरूपी जतन केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
एकूणच, हा दौरा केवळ भेटीचा नव्हता, तर गुरू- शिष्याच नातं अतूट करणारा सोहळा ठरला.

15210

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT