पुणे

तांबडेमळा- मंचर एसटी आगारात अभिवादन

CD

मंचर, ता. २० : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत तांबडेमळा- मंचर (ता. आंबेगाव) एसटी आगारात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रवासी सेवा बजावत असताना शिवरायांच्या विचारांचे अनुकरण व्हावे, या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सीमा येवले, दिपिका घरडे आणि वंदना बुरूड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक पांडुरंग मुठे व वाहतूक निरीक्षक साधना कालेकर यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शिवरायांना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली.
महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पोवाडे, संगीत, भजन तसेच, शिवव्याख्यान यांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमधून शौर्य, स्वराज्य आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश देण्यात आला. कर्मचारी व प्रवासी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
याप्रसंगी प्रवीण गाडेकर, संजय डेंगळे, पंकज भुजबळ, अशोक चिमटे, योगेश हुले, विकास गोरडे, श्रीरंग तांबडे यांच्यासह आगारातील कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप पडवळ यांनी केले. एसटी आगारातील या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तिचा आणि प्रेरणेचा उत्साह अनुभवायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, १४ हजार लिटर ज्वलनशील साठा; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

CTET फेब्रुवारी 2026 उत्तरपत्रिका लवकरच होणार जाहीर; जाणून घ्या डाउनलोड आणि इन्स्टॉलेशन प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, पेट्रोल रस्त्यावर पडल्याने खळबळ

साप्ताहिक राशिभविष्य : (२२ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६)

Homi Bhabha Documentary Films Division : डॉ. होमी भाभा; विज्ञानाचा द्रष्टा शिल्पकार!

SCROLL FOR NEXT