मंचर, ता. २३ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी(ता. २२) तरकारी शेतमालाची एकूण सात हजार ४४२ डाग आवक झाली. आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने अनेक तरकारी पिकांच्या बाजारभावात काही प्रमाणात वाढ झाल्याची माहिती बाजारसमितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
विशेष म्हणजे हिरवी मिरची व लसूण या पिकांना दहा किलोला उच्चांकी एक हजार रुपये असा बाजारभाव मिळाला. हिरवी मिरचीची ७२ डाग आवक होऊन दर २५०रुपये ते एक हजार रुपये, तर लसणाची दोन डाग आवक होऊन दर ४५१ रुपये ते एक हजार रुपये झाला आहे. “आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर व पारनेर या पाच तालुक्यातील शेतीमाल शेतकरी मंचर येथे विक्रीसाठी आणता. सध्या उन्हाळा असल्याने अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे शेतीमाल उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे,” अशी माहिती बाजारसमितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
शेतमालाचे नाव व दहा किलोचे बाजारभाव रुपयात: टोमॅटो : १००-२५०, फ्लावर : १०-१२०, वटाणा : १५०-३८०, गवार : ३५०, बीट : २०-११०, घेवडा: १५०-३५०, चवळी : १३०-४६०, ढोबळी मिरची : १००-४००, भेंडी : ३००-४८०, फरशी : ५०-३५०, तोंडली : १००-४३०, काकडी : २०-१२०, वांगी : २०-१५०, दुधी भोपळा : ४०-२००, आले : १००-५०१, मका : ५०-१५०, कोबी : २०-८०, काळा वाल : ६१०, लिंबू : १००-६४०,तूर : ३००, पावटा : २५०-७५०, चिवचिव वांगी : १००, घोसाळी : १८०, शेवगा : २२०-५२०.
15291
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.