पुणे

मंचर नगरपंचायतीचे २१५ कोटींचे अंदाजपत्रक

CD

मंचर, ता. २५ : आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीचे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी २१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, कार्यालय अधीक्षक वरद थोरात, लेखाधिकारी महेश पाचोरे, बांधकाम अभियंता संदीप पवार, कर व प्रशासकीय अधिकारी मनोज सरदार तसेच मान्यवर सदस्य उपस्थित होते.
लेखाधिकारी महेश पाचोरे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा पुरवणे आणि उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीवर भर देणे, हे या अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात वाढ अपेक्षित धरून उपलब्ध निधीचा विनियोग लोकहितार्थ केला जाणार असल्याचे गांजाळे यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प नागरिकांना पाहण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध असेल. दरम्यान, सदस्यांनी सुचविलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करून अंदाजपत्रकात आवश्यक ते बदल करण्यात आले. त्यानंतर सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्पास एकमताने मंजुरी दिली.


अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण तरतूद
पिण्याच्या पाण्याच्या योजना बळकट करणे
सिमेंट काँक्रीट रस्ते व गटार विकास
महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, आर्थिक दुर्बल घटकांसाठी तरतूद
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन सुधारणा
पथदिवे व ऊर्जा बचत योजना
मंचर शहर सुशोभीकरण, हरित उपक्रम राबविण्यास, आरोग्य व सार्वजनिक सुविधा सुधारण्यास प्राधान्य देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT