मंचर, ता. २६ : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी (स्व.) सुखाशेठ जाधव (फुलवाले) यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त जाधववाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. २८) रात्री नऊ वाजता हास्यजत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात हास्य जत्रा फेम समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, अंकुर वाढवे, नम्रता सुमिराज, राधा खुडे आदी कलाकार सहभागी होणार असून, विविध विनोदी प्रसंग व गीतांतून हास्याचे फवारे उडवले जाणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल कुमार गायकवाड, जलसंपदा विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून, कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व जाधववाडीचे उपसरपंच संपतराव जाधव यांनी केले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.