मंचर, ता. २८ : येथील महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी (ता. २७) जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नितीन बाणखेले होते.
बाणखेले यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करताना, विद्यार्थ्यांनी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिकांची चरित्रे, कथा, कादंबऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यकथांचे वाचन करावे, असे आवाहन केले.
यावेळी उपमुख्याध्यापक महेंद्र कारंडे, पर्यवेक्षक दशरथ काळे उपस्थित होते. विद्यार्थिनी आदिती मासळकर, वैभवी शेलार व मधुला बोंबे यांनी मराठी भाषेचे महत्त्व, कुसुमाग्रज यांचे साहित्यिक कार्य व मराठी भाषेचा अभिमान या विषयांवर मनोगते व्यक्त केली.
सोनाली शिंदे, तृप्ती कराळे, दुर्गा चौधरी, संदेश पिंगळे व मारुती बोऱ्हाडे यांनी व्यवस्था पाहिली. सूत्रसंचालन दुर्वा कानसकर हिने केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.