पुणे

मंचर बसस्थानकात चोरी करणारे गजाआड

CD

मंचर, ता. २८ : मंचर (ता. आंबेगाव)एसटी बस स्थानक परिसरात मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या बॅगा व दागिन्यांची चोरी करणाऱ्या तिघांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले २४ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. बेबीनंदा इंद्रजित कसबे (वय ५०, रा. विलासनगर, जि.लातूर), स्वाती उमाकांत तपसाळे (वय ३६, रा.आष्टा जहागीर, ता. उमरगा, जि. धाराशीव,शिवाजी सुभाष घोलप (वय ३६, रा. जागनी, ता. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील दोन महिला आणि एक पुरुष नारायणगाव मार्गे पुण्याकडे चारचाकी वाहनाने येत आहेत. या माहितीच्या आधारे मंचर पोलिसांनी नारायणगाव-भोरवाडी फाटा (ता. जुन्नर) परिसरात सापळा रचला. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन महिला व एक पुरुष आढळून आले. सखोल चौकशी केल्यानंतर आरोपींनी त्यांनी १० सप्टेंबर २०२५ व १५ फेब्रुवारी २०२६ ला मंचर बस स्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दोन गंठण गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली दिली.या कारवाईत पोलिसांनी २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण सुमारे २ लाख ४४ हजार १८९ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, साहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस हवालदार संजय नाडेकर, शेखर भोंडवे, सुनील मोरे तसेच पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT