पुणे

मंचर नगरपंचायत इमारतीच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था

CD

मंचर, ता. ११ : मंचर नगरपंचायत इमारतीमधील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, येथील १५ गाळाधारक व्यावसायिक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे.
नगरपंचायत इमारतीच्या तळमजल्यावरील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे व्यावसायिकांना दुकाने चालवणे कठीण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते नवनाथ थोरात यांनी या ठिकाणची पाहणी करून अधिकाऱ्यांना अस्वच्छतेचे फोटो दाखवत जाब विचारला. शहरात पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची गैरसोय होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. तसेच, गेल्या दोन महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने विकासकामे ठप्प असल्याचा आरोप करत तातडीने नियुक्तीची मागणी केली. सध्या राजगुरुनगर येथील मुख्याधिकाऱ्यांकडे तात्पुरता अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. एवढ्या मोठ्या नगरपंचायतीसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी थोरात यांनी केली.


स्वच्छतागृहाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, दररोज दोन वेळा साफसफाई करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यापुढे अस्वच्छता आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- राजश्री गांजाळे, नगराध्यक्षा, मंचर नगरपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT