पुणे

मंचरला मोफत कर्करोग, नेत्र तपासणी शिबिर

CD

मंचर, ता. ११ : मंचर (ता. आंबेगाव) येथे स्व. गणपत भिवसेन बाणखेले यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (ता. १०) आयोजित केलेल्या मोफत कर्करोग तपासणी व नेत्र तपासणी शिबिरात १९० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्‍घाटन मंचरचे माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले व प्रा. राजाराम बाणखेले यांच्या हस्ते करण्यात आले. तळेगाव येथील टीजीएच ऑनको कॅन्सर सेंटर व नेत्रदीप नेत्र रुग्णालय, राजगुरुनगर यांच्या वतीने १०५ रुग्णांची कर्करोग निदान तपासणी करण्यात आली. त्यामधील १२ रुग्णांना पुढील तपासणीसाठी तळेगाव रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे. तसेच, यावेळी ८५ नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. यामधील चार रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी २० रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे. शिबिरावेळी सर्व रुग्णांची भोजन व्यवस्था केली होती, अशी माहिती प्रा. बाणखेले यांनी दिली. शिबिराला आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी भेट दिली. आशादेवी बाणखेले, रजनीगंधा बाणखेले, उज्ज्वला बाणखेले यांनी व्यवस्था पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT