पुणे

मंचर नगरपंचायतीकडे ४.२१ कोटींची मालमत्ता कर थकबाकी

CD

मंचर, ता. ११ : ‘‘मंचर नगरपंचायतीकडे मालमत्ता कराची तब्बल ४ कोटी २१ लाख ४५ हजार रुपये थकबाकी असून थकबाकीदार मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर मालमत्ता जप्त करणे, सील करणे, लिलाव करणे तसेच नळ कनेक्शन खंडित करणे अशा कारवाया करण्यात येतील,’’ असा इशारा नगरपंचायतीचे अतिरिक्त मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिला आहे.

मंचर शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकीत वसुली वाढविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात एकूण १५ हजार ७८९ मालमत्ता असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची एकूण मागणी ७ कोटी ८५ लाख ६२ हजार रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत २ कोटी ५८ लाख १९ हजार रुपये वसूल झाले असून सुमारे ४ कोटी २१ लाख ४५ हजार रुपये वसुल करणे बाकी आहे.
तसेच शहरात ५ हजार ६३३ नळजोडण्या असून पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी ५५ लाख ७१ हजार रुपये आहे. त्यापैकी ३८ लाख ४१ हजार रुपये वसुल झाले असून १ कोटी १७ लाख २९ हजार रुपये वसुल करणे बाकी आहे.

थकीत कर वसुलीसाठी नगरपंचायतीने शहरातील ६ वॉर्डमध्ये प्रत्येकी चार कर्मचारी नियुक्त केले असून ते संबंधित मालमत्ताधारकांकडील थकीत व चालू कराची वसुली करत आहेत. मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून आतापर्यंत १०० पेक्षा अधिक मालमत्ताधारकांना १५ दिवसांच्या मुदतीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
वसुली वाढविण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले असून प्रत्येक विभागप्रमुखांना १५ लाख रुपये तर इतर कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपये इतके वसुलीचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी दिले आहे. वॉर्डनिहाय थकीत देयकदारांची सविस्तर यादी (नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह) संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून प्रत्यक्ष संपर्क साधून वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरातील नागरिकांनी जप्ती किंवा नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा तात्काळ करावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

दृष्टिक्षेप :
मालमत्ता कराची एकूण मागणी : ७ कोटी ८५ लाख ६२ हजार रुपये
वसुली झालेली रक्कम : २ कोटी ५८ लाख १९ हजार रुपये
थकबाकी : ४ कोटी २१ लाख ४५ हजार रुपये
पाणीपट्टीची मागणी : १ कोटी ५५ लाख ७१ हजार रुपये
पाणीपट्टी वसुली : ३८ लाख ४१ हजार रुपये
पाणीपट्टी थकबाकी : १ कोटी १७ लाख २९ हजार रुपये
शहरातील मालमत्ता : १५,७८९
नळजोडण्या : ५,६३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT